Saturday, July 20, 2024

गुरुविण कोण दाखविल वाट!

Guru Purnima 

गुरुविण कोण दाखविल वाटकिती खरे आहे हेगुरूच नसतील आपल्याला वाट कशी  दिसेलआपल्या भारतीय परंपरेत गुरु शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहेआणि त्या परंपरेतला सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमाचला तर मग आज जाणून घेउयात या दिवसाविषयी.

 

थोडासा इतिहास

आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणले जातेहि पौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवसयाच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असे मानले जातेमहर्षी व्यास यांना प्रथम गुरु मानतात कारण ते मानव जातीला वेद शिकवणारे पहिले महर्षी होतेआणि म्हणूनच गुरुपौर्णिमा हि व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते.

 

गुरु-शिष्य व्याख्या

शिकण्याची तयारी असणारा तो शिष्य आणि शिकवण्याची मनापासून तगमग असलेले ते गुरु, हि गुरु शिष्याची साधी व्याख्या.
गुरु हे आपल्या आयुष्यात एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे असतातशिष्यांनी सन्मार्गापासून भरकटू नये म्हणून ते नेहमी त्यांना योग्य वाट दाखवत असतात

 

गुरूंशी आपली झालेली ओळख

आपले सगळ्यात पहिले गुरु हे आपले आई-वडील असतातआई-वडिलांइतके निस्वार्थपणे आपल्याला जगात कोणीच शिकवत नाहीनंतरशाळेतले शिक्षक आपल्याला गुरूच्या रूपात लाभतातत्यानंतर महाविद्यालयातले शिक्षकहि आपल्या खूप काही शिकवून जातातमाणूस हा आयुष्यभराचा शिष्य असतो असे मानले तर आपल्याला तसे अनेक गुरु या पूर्ण आयुष्यभरात मिळतातआपली भावंडेनातेवाईकमित्र परिवारआपल्या आजूबाजूची लोक असे अनेक गुरु आपल्याला लाभतातयांच्याकडूनही आपण कळत-नकळत काहीना काहीतरी शिकत असतोचआपल्यातल्या कलागुणांनाएखाद्या छंदाला वाव देणारेही गुरुच असतात.

 

चांगल्या गुरूंची पारख

चांगल्या गुरूंची पारख कशी करावीपूर्वीच्या काळात हा प्रश्न फारसा पडत नसला तरी आत्ताच्या युगात मात्र आपल्याला हा प्रश्न पडू शकतोढोबळमानाने खाली दिलेल्या गोष्टी ज्या व्यक्तीला लागू पडतात त्यांना आपण चांगले गुरु म्हणू शकतो.
ज्ञानाचा  सागर असूनही राहणीमान अतिशय साधे असते.
शिष्याचे वित्त हरण करण्यापेक्षा चित्त हरण्याकडे जास्ती लक्ष्य असतेम्हणजेच विद्यादानातून मिळणाऱ्या पैश्यांपेक्षा, आपला शिष्य आपण शिकवतोय यात कसा पारंगत होईल याकडे जास्ती लक्ष्य असते.
अनेक चांगल्या गुरूंना आपला शिष्य आपल्यापेक्षा सवाई व्हावा हि मनोमन इच्छा असतेत्यामुळे हातचे काहीही राखून  ठेवता विद्येचे दान दिले जाते.
शिकवल्या गेलेल्या विद्येत शिष्य पारंगत होईल याबरोबर आपला शिष्य एक चांगला माणूसनागरिक कसा बनेल याकडेही कसोशीने चांगले गुरु लक्ष्य देतातइथे विद्येबरोबर नैतिकतेचे धडेहि शिष्यांना मिळतात.
यशस्वी झालेल्या  शिष्याने आपल्याला श्रेय द्यावे असेही या गुरूंना वाटत नाहीउलट असे श्रेय कोणी शिष्य देत असेल तरी ते नम्रपणे नाकारतात आणि मोठेपणाने सगळे श्रेय त्या शिष्याच्या जिद्दीलाकष्टाला देतातअर्थात जेव्हा कोणी त्यांना यशस्वी शिष्याचा गुरु म्हणून ओळखतो तेव्हा मात्र त्यांचा उर अभिमानाने भरून येतो.
हे गुरु नेहमी त्यांच्यावर शिष्यांचा प्रथम हक्क आहे हे मान्य करतातत्यामुळे शिष्य नेहमी त्यांच्या विद्यार्जनात काही अडचणी आल्या किंवा काही शंका असल्यास कधीहीकोठेही त्याचे आपल्या गुरूंकडून निरसन करून घेऊ शकतात.

 

हि होती काहीशी माहिती गुरुपौर्णिमा आणि गुरूंविषयीचला तर मग या गुरुपौर्णिमेला आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक गुरूंचे स्मरण करूनत्यांना वंदना करून त्यांच्याप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करूयात!
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः।।
तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

1 comment:

सुखकर्ता दुःखहर्ता…

गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातली चतुर्थी, गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. खरे तर हा दिवस एका मोठ्या उत्सवाची सुरुवात म्हणून ओळखला जातो. ...